मुंबई । सलमान खान हा लोकप्रिय अभिनेता आहे मात्र त्याने वाल्मिकी समाजाबद्दल वापरलेला जातीवाचक शब्द अवमानकारक आणि समस्त दलितांच्या भावना दुखविणारा आहे. सलमान खानच्या त्या वक्तव्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले व्यक्त केले. वाल्मिकी समाजबद्दलचा केलेले उल्लेख अवमानकारक आहे त्यामुळे वाल्मीकी समाजासह समस्त दलित समाजाची सलमान खानने माफी मागावी यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे बांद्रा पश्चिम येथील सलमान खानच्या घरासमोर तीव्र निषेध आंदोलन रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
कारवाईसाठी पोलीसांना निवेदन
सलमान खानने एका खाजगी वहिनीवर वाल्मिकी समाजाचा जातीवाचक शब्द वापरून घोर अवमान केला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. शिल्पा शेट्टी या लोकप्रिय अभिनेत्रीनेही असा जातीवाचक अवमानकारक उल्लेख केल्याने रिपाइं च्या वतीने शिल्पा शेट्टीचा ही निषेध करण्यात येत आहे. रिपाइंच्या वतीने नवीन लादे आणि किशोर मासुम यांनी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अंधेरी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले आहे. सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी दलितांची माफी मागितली नाही तर रिपाइंतर्फे आंदोलनाचा आगडोंब राज्यात उसळलेला दिसेल त्याची सर्वस्वी जबाबदारी या सलमान खान अभिनेत्यावर असेल असा इशारा रिपाइंतर्फे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांनी दिला आहे.