रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत झोपडपट्टी हक्क परिषद – गौतम सोनवणे

0

मुंबई । रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात येत्या 19 ऑगस्ट रोजी बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात झोपडपट्टी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या झोपडपट्टी परिषदेस सर्व झोपडीवासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.

मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांचे विविध प्रश्न तसेच एस आर ए योजनेतील अडचणी यविषयांवर झोपडपट्टी हक्क परिषदेत चर्चा होणार आहे. सन 2000 नंतर च्या झोपडपट्ट्यांना अधिकृत मान्यतेचा प्रश्न तसेच विमानतळ; पाईपलाईन; वन जमिनीवरील झोपडपट्ट्या ; रेल्वे लगत च्या झोपड्या तसेच रस्ते मेट्रो बाधित झोपड्यांचे एम एम आर डी ए ने पुनर्वसन करून स्थलांतरित केलेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मुंबई विकास आराखड्यात येणाऱ्या झोपड्यांचे संरक्षण करणे तसेच बीपीटी च्या जमिनीवरील झोपड्यांचे त्याच जागेवर पुनर्वसन करणे या विविध प्रश्नांवर मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे झोपडपट्टी हक्क परिषद चे आयोजन केल्याची माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे .