जळगाव । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवलेगट) महिला आघाडीच्या वतीने थोर समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती रामेश्वर कॉलनी भागातील शांतीनारायण नगर, येथील महिला आघाडीच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हा उपाध्यक्ष-नितिन आस्मार, जळगाव तालुका अध्यक्ष रमाताई ढिवरे यांनी पुष्पहार अर्पण केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा
महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळै यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे जिवनकार्या बद्दल सांगीतले. यावेळी सुनिता वाघ, सुरेखा बेडसे, शोभा खैरनार, लतावाघ, मनिषा पाटील, हर्षाली देवरे, प्रमोद देवरे, सुमन चव्हाण, बाळा इंगळे, निलिमा वरणकर, सुलोचना माळी, रेखा जाधव, निलेश महाजन, जनार्दन पंधारे, ईश्वर चंद्र, अभिजीत भावसार, अनिल जाधव, किरण कोळी, महेंद्र मराठे, शेखर चितळे, सागर पवार, बापु सोनवणे, नाना कोळी, मनोज कोळी, बबलु सपकाळे, लता पाटील, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.