पिंपरी – रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदी अजय लोंढे यांची निवड करण्यात आली. तर पिंपरी-चिंचवड शहराच्या उपाध्यक्षपदी भारत मिरपगारे, अमोल उबाळे यांची निवड झाली आहे. रिपब्लिकन मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
रिपब्लिकन युवा मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडली. बैठकीला रिपब्लिकन मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.