शहादा । तालुक्यातील वैजाली येथील कानुबाईचे विसर्जन महीला-पुरूष, मुल-मुलींनी फुगड्या खेळत पावसाच्या रिपरीपीत ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. खान्देशातील जिव्हाळ्याचा मानला जाणारा कानुबाईची स्थापना रविवारी केली गेली होती. या उत्सवात लोकांची दुरावलेली मने एकञ येत असल्याचे दिसून आले. नोकरी निमीत्त बाहेर गावाला गेलेले या दिवसी गावात आलेले होते. ओस वाटनारे गाव या उत्सवात याञेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शनिवारी रात्री रोटचे दळण जात्यावर दळून कानुबाईचे गीत गातात. रविवारी कानुबाईची स्थापना केली गेली होती. संपुर्ण राञ जागरण करून कानुबाईचे गुणगान गाणारे गीत म्हटले गेली .वैजाली गावातील ह.भ.प.भजणी मंडळाने प्रत्येकाच्या घरी स्थापना केलेल्या कानुमातेजवळ भजने म्हणत संपुर्ण राञ जागरण केले. संपुर्ण वैजाली गावात राञी माय तुना डोंगर हिरवा गारची धुन सुरू होती.
गरबा, फुगड्या खेळून कानुबाईची गायली महती
सोमवारी सकाळी प्रत्येकाने आपआपल्या स्थापना केलेल्या कानुमातेला अंगणात आरती करून चौरंगावर ठेवण्यात आले. व त्या त्या गल्लीतील महिला पुरूष, बाल गोपाळ मुल मुली गोल रिंगण करून मातेजवळ गरबा, फुगड्या खेळून मातेची महती गात होते. नंतर संपुर्ण वैजाली गावातील कानुबाईंचा चौरंग डोक्यावर धरत नाचत गाजत शिवाजी चौकात आणले व त्या ठीकाणी एकत्र येऊन एकमेकांनी कानुमातेला भेट घालुन, आदला बदल करून नाचू लागले. यावर्षी गावात जवळ पास 35 लोकांनी कानुमातेची स्थापना केली होती. शिवाजी चौकात संपुर्ण गाव एकत्र येऊन जवळ पास एक तास गरबा व फुगड्या खेळत मातेचे गुणगान गाणारे गीत म्हणण्यात आली. संपुर्ण गावात यात्रेचे स्वरूप आले होते. नंतर ढोलताशांच्या गजरात गावातीलच वाकी नदित कानुबाईचे विसर्जन कार्यक्रम शांततेत झाला.
नवापूर येथे रंगावली नदीत विसर्जन
नवापूर-खान्देशाची कुलदैवत कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 30 जुलै रोजी कानुबाई मातेची स्थापना झाली रात्री गल्लोगल्ली मातेची स्थापना करण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन रोटचा कार्यक्म झाला रात्री पुजा अर्चा कार्यक्रम संपन्न होऊन रात्रीभर जागरण करुन कानुबाईची गाणे म्हटली जातात. यावेळी अनेर नातेवाईक बाहेर गावाहुन आले होते जुने मित्र मंडळी अनेक वर्षानी या उत्सवात एकत्र आल्याने त्यांचा चेहर्यावर आनंद दिसुन येत होता. सकाळी दहा नंतर पारंपारीक पध्दतीने शहरातील विविध भागातुन कानुबाईची वाजत गाजत नाचत मिरवणुका निघाले.