रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0

जळगाव। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयातर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी एकदिवशीय धरणे आंदोलन करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, महिला तालुकाध्यक्ष रमाबाई ढिवरे, महानगर युवाध्यक्ष मिलींद सोनवणे, महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे, महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा भालेराव, सचिव दिपक बाविस्कर, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, संघटक खंडू महाले, अविनाश पारधे, भिमराव सोनवणे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्‍या होत्या.

रिपाइंतर्फे पुढीलप्रमाणे होत्या मागण्या
विविध मागासवर्गीय महामंडळातद्वारे विक्री करण्यात आलेले कर्ज त्वरीत माफ करावे, एपीएल व बीपीएल धारकांचे घरकुलाचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, शहरातील सर्व गोरगरीबांना रेशनकार्ड देऊन अन्नधान्य द्यावे, दारीद्रयरेषेखालील कुटुंबांचा विभागनिहाय वर्गवारी करुन पुर्ण सर्व्हे करण्यात यावा, स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत चालु असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे अनुदान देय असणार्‍या कुटुंबप्रमुखांना सत्वर कार्यवाही करुन त्वरीत देण्यात यावे, प्रत्येक महामंडळामार्फत पाच लाखाचे कर्ज विनाअट थेट महामंडळामार्फत देण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगारांचे जिल्हा उद्योग केंद्रमार्फत घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे, श्रावण बाळे, विधवा, परित्न्त्या, निराधार व अपंग यांना मिळणारे तुटपुंज्या अनुदानात वाढ करून मासिक दोन हजार रूपये करावे, महागाई निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढ करण्यात यावी, शेतकर्‍यांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.