जळगाव । केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी आज अजिंठा शासकिय विश्रामगृहात आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना मार्गदर्शन केले. चोपडा येथे होणार्या अरूणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर होते. त्यानिमित्ताने जळगाव येथे थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कार्यकर्त्यांनी तळागाळांपर्यंत पोहचवावे
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पक्ष संघटनावर लक्ष देण्याचे तसेच गाव तेथे शाखा व रिपाइंची कामे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, तसेच तळागाळातील नागरीकांची समस्या व अडीअडची सोडवावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 18 जून रोजी जळगाव शहरात रिपाइंच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून यावेळी शहरासह जिल्ह्यात रिपाइंतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले असल्याचे महानगरध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले. यावेळी रमेश मकासरे, रविंद्र खरात, आनंद बाविस्कर, निल अडकमोल, रविंद्रनाथ तायडे, जिल्हा सचिव भारत मोरे, अनुप मनोरे, दीपक सपकाळे, प्रताप बनसोडे, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, अशोक पारधे, महिला आघाडीच्या रमा ढिवरे, किरण जाधव, नरेंद्र मोरे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.