रिफायनरी गुहागरला नेण्याचा प्रयत्न करणार- ना. अनंत गीते

0

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील प्रस्तावित ग्रीफ रिफायनरी व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी स्पष्टपणे पुन्हा एकदा बाजू मांडली आहे. ग्रीन रिफायनरीची उभारणी करताना गावे उध्वस्त होऊन प्रकल्प उभारावा या मताचे आपण नाही. त्यासाठी हा प्रकल्प गुहागरला एकही घर न उठवता उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी होत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नसून, सुरक्षिततेच्या दृष्टीने जैतापूरला असल्याचे त्यांनी सांगितले.

एनडीए सरकारला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने रत्नागिरीत केंद्र सरकारच्या प्रभावी योजनांच्या संमेलनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी राजापूरमधील नाणार येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीबाबत आपले मत व्यक्त केले. या प्रकल्पाला तेथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत आहे.