‘मालामाल विकली’ आणि ‘गॅँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री रिमा सेन हिच्या विरोधात अश्लीलता पसरविल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते. होय, अभिनेत्री रिमा सेन बोल्ड सीन्स देण्यास कधीच मागे हटली नाही. ती अशाप्रकारचे सीन सहजपणे करायची. ज्यामुळे तिला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला. रिमावर अश्लीलता पसरवण्यावरून ठपका ठेवण्यात आला होता.
19 ऑक्टोबर 1981 मध्ये जन्मलेल्या रिमा सेनने कोलकाता येथून तिचे शिक्षण पूर्ण केले. पुढे तिने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. जबरदस्त अभिनय आणि बिनधास्त बोल्ड सीन्स देण्यावरून ती अल्पावधितच इंडस्ट्रीमध्ये हिट ठरली. याच कारणामुळे 2006 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अश्लील फोटोशूट करून अश्लीलता पसरवण्यावरून रिमाच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. रिमाचे हे फोटो एका तामीळ वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले होते. अशातही रिमाच्या बोल्डनेसवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. 2011 मध्ये तिने ‘इलावारसी’ या तामीळ चित्रपटात जबरदस्त बोल्ड सीन्स देऊन खळबळ उडवून दिली होती. कारण हे सीन्स खूपच आक्षेपार्ह होते. शिवाय याला नंतर विरोधही केला गेला. साउथ इंडस्ट्रीमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर रिमा 2001 मध्ये मुंबईला आली होती.