रिलायंस गॅसपाईप लाईन बाधीत शेतकर्‍यांचे प्रांताधिकार्‍यांना साकडे

0

वाडा : रिलायंस कंपनीची गॅस पाईपलाईनने बाधीत होत असलेल्या शेतकरीवर्गाने वाडा प्रांत अधिकार्यांईना तक्रारी निवेदन दिले. गॅस कंपनी व्यवस्थापन व भूमि संपादित विभागाची बैठक घेण्यात येईल असल्याचे आश्वासन वाडा प्रांताधिकारी एम.नळदकर यांनी यावेळी बोलताना दिली. तालुक्यातील बिलोशी, बिलावली, चिंचघर, डोंगस्ते गावातून रिलायंस कंपनीची गॅस पाईपलाईन ही नव्या मार्गाने नेली जात आहे. याअगोदर शेतकरीवर्गाच्या शेतजमीनीतून गेलेली जुनी पाईपलाईन बंद करून ती नव्याने जात असलेल्या मार्गाने नेण्यात यावी. तसेच पाईप लाईनसाठी संपादित केलेल्या शेतजमीनीच्या क्षेत्रावरच्या रिलायंस गॅस पाईप लाईनच्या सातबारावरच्या नोंदी कमी कराव्यात अशी मागणी इथल्या शेतकरी वर्गाने केली आहे.

भराव टाकल्याने भात लागवड करणे कठीण
पाईप लाईन टाकत असताना रिलायंस कंपनीने शेतजमीनेचे नुकसान करून शेतजमीनीत मातीचा मोठा भराव टाकल्याने आजघडीला भात लागवड करणे कठीण बनल्याचा आरोप शेतकरीवर्गाने केला आहे. यावर वाडा प्रांत अधिकारी एम. नळदकर यांनी वाडा पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार पाटील यांच्यासमवेत बाधीत शेतकरीवर्गाची बैठक घेण्यात आली. तसेच पुढे रिलायंस गॅसपाईप लाईन व्यवस्थापन कर्मचारी व भूमि संपादित विभाग कर्मचारी यांची शेतकरीवर्गासोबत संयुक्त बैठक घेऊन याबाबत योग्य मार्ग काढला जाईल असे प्रांताधिकारी यांनी शेतकरीवर्गाला आश्वासित केले.