रिलायन्स इंडस्ट्रीजने टीसीएसला टाकले मागे; बनली सर्वाधिक मोठी कंपनी

0

नवी दिल्ली-रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ही देशातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी बनली आहे. मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजा दरम्यान मुकेश अंबानी यांची आरआईएलचा बाजार मूल्य 7.43 लाख करोड इतका होता. ते टीसीएस पेक्षा अधिक आहे. त्यामुळे अंबानी यांच्या कंपनीने टाटा यांच्या टीसीएसला मागे टाकले आहे.

टीसीएसचे बाजार मूल्य 7.39 लाख करोड़ रुपए आहे. मार्केट कॅपमध्ये टीसीएस प्रथम क्रमांकावर होती. मंगळवारी आरआईएलचे शेअर 2 टक्क्यांनी वाढून 1175 वर पोहोचले. सोमवार शेअरचे दर 1150 रुपए होते.

टीसीएस मध्ये घसरण का झाली?
टीसीएसचे बाजार मूल्य सोमवारी 7.45 लाख करोड होते. मात्र मंगळवारी शेअर मार्केटच्या कामकाजदरम्यान 0.70 टक्क्यांनी घसरण झाली त्यामुळे बाजार मूल्य घसरले.