मुबंई। रिलायन्स जिओने गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली आहे. त्या पाश्वभूमीवर आता या सुविधांची येत्या 31 मार्च पर्यंत मोफत डेटा व कॉलींग सुविधा प्रदान करण्यात आले असून अशी सुविधा पुढे कायम मिळावे यासाठी रिलायन्सने काही अटी लागू केल्या आहेत. 1 एप्रिलपासून जिओच्या सेवांमध्ये पैसे मोजावे लागणार आहे. शिवाय स्वस्तात डेटा हवा असल्यास जिओने प्राईम मेंबरशीप ऑफर ठेवली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही ही मेंबरशीप घेऊ शकता. मात्र जिओच्या फ्री डेटा प्लॅनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना अट घालण्यात आली आहे. जिओच्या प्राईम मेंबरशीप अंतर्गत बाय वन गेट वन फ्री ऑफर चालू करण्यात आली आहे. यामध्ये 303 रुपयांचा रिचार्ज केल्यास 5 जीबी 4 जी डेटा, तसेच 499 चा रिचार्ज केल्यास 10 जीबी 4 जी डेटा फ्री मिळणार आहे.
जिओ मेंबरशीप घेतल्यानंतर विविध टेरिफच्या सुविधा मिळणार
या प्लॅन अंतर्गत जिओ प्राईम मेंबरशीप घेतल्यानंतर 303 रुपयांच्या प्लॅनसोबत प्रत्येक महिन्याला 5 जीबीप्रमाणे वर्षाला 60 जीबी फ्री डेटा मिळेल. 499 रुपयांच्या प्लॅनसोबत महिन्याला 10 जीबी प्रमाणे वर्षाला 120 जीबी डेटा फ्री मिळेल. मात्र यासाठी कंपनीकडून एक अट ठेवण्यात आली आहे. तुम्हाला या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पूर्ण 12 महिन्यांचा रिचार्ज एकदाच करावा लागणार आहे. जर तुम्ही 303 रुपयांचा प्लॅन घेत असाल तर तुम्हाला वर्षाचे 3636 रुपये याप्रमाणे रिचार्ज कारावा लागेल. तसेच 499 चा प्लॅन घेत असाल तर 12 माहिन्यांचे 5988 रुपये याप्रमाणे रिचार्ज करावा लागेल. यानंतर तुम्हाला महिन्याला 10 जीबी प्रमाणे वर्षाला 120 जीबी डेटा फ्री मिळेल. सध्या 31 मार्चपर्यंत जिओची प्राईम मेंबरशीप घेण्याची मुदत आहे. प्राईम मेंबरशीपची मुदत वाढवण्यात आल्याची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही. रिलायन्स जिओची मोफत सेवा 31 मार्चपासून संपुष्टात येणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून जिओची प्राईम मेंबरशिप सेवा सुरू होणार आहे. 31 मार्चपर्यंत यासाठी नोंदणी करता येणार आहे.
या ऑफरनुसार ग्राहकांना 1 एप्रिल 2018 पर्यंत ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरचा लाभ घेता येईल. म्हणजे प्रत्येक दिवशी 1ॠइ डेटा आणि मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची प्राईम मेंबरशिप मिळवण्यासाठी जिओ युझरला 99 रूपये द्यावे लागतील. एका वर्षासाठी ही मेंबरशिप असेल. त्यानुसार 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1 जीबी प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे. ग्राहकांना 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान प्राईम मेंबरशिपसाठी नोंदणी करता येणार आहे.
मेंबरशिप घेतली नाही तर …
जर तुम्ही मेंबरशिप घेतली नाही तर तुमचं जिओ सिम प्रीपेड किंवा पोस्टपेडमध्ये बदलण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावे लागेल. टेरिफ प्लॅननुसारही व्हॉईस कॉलिंग मोफत असेल मात्र, इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागतील. प्राईम मेंबरशिप न घेणार्यांना सप्टेंबरमध्ये जिओने लॉन्च केलेल्या टेरिफ प्लॅननुसार 50 रुपयात 1 जीबी 4 जीबी डेटा, 999 रुपयात 10 जीबी डेटा, 1499 रुपयात 20 जीबी डेटा, 2499 रुपयात 35 जीबी डेटा मिळेल.