नवी दिल्ली। रिलायन्स जिओ गुगलच्या मदतीनं सर्वात स्वस्त 4जी स्मार्ट फोन तयार करत असल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. या स्मार्ट फोनवर फक्त जिओचं 4जी नेटवर्क चालणार आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात हा स्वस्त स्मार्ट फोन रिलायन्स जिओ लाँच करण्याची शक्यता आहे, अशी माहिती बिझनेस लाइनच्या रिपोर्टमधून उघड झाली आहे.
स्मार्टफोनशिवाय गुगल आणि रिलायन्स जिओ मिळून स्मार्ट टीव्ही सर्व्हिससाठी सॉफ्टवेअरही डेव्हलप करत असून, हे सॉफ्टवेअर जिओच्या वापरकर्त्यांनाही वापरता येणार आहे. यंदाच्या वर्षी जिओचं स्मार्ट टीव्ही सर्व्हिस दुस-या भागामध्ये लाँच करण्यात येऊ शकते.