मुंबई । आपल्या देशात क्रिकेट धर्म मानला जातो. या क्रिकेट मध्ये ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्ड अनेक गमतीजमती घडत असतात. हेच ध्यानात ठेऊन रिलायन्स जियो तर्फे क्रिकेट आणि कॉमेडीचा संगम करणारा जियो धन धना धन लाईव्ह नावाचा क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर विनोदी शो लाँच करण्यात आला. क्रिकेटमय झालेल्या देशात जियो ने एक मोबाईल गेम जियो क्रिकेट प्ले लॉन्ग पण लाँच केलाय ज्यातर्फे लाखो लोक काही कोटी रुपयांची बक्षिसे मिळवू शकणार आहेत. हा गेम सर्व स्मार्टफोन्स वर उपलब्ध होऊ शकतो माय जियो ऍप डाउनलोड करून.
7 आठवडे आणि 60 मॅचेस साठी हा गेम तब्बल 11 भारतीय भाषांमधून उपलब्ध असेल. हा गेम खेळताना दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या दिवशी क्रिकेट आणि कॉमेडी चा संगम करणारा जियो धन धना धन लाईव्ह शोचा आनंद उपभोगता येणार आहे. जियो धन धना धन लाईव्ह या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे प्रसिद्ध हास्यकलाकार सुनील ग्रोवर. भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार कपिल देव खेळासंबंधी व सामान्यांविषयी माहिती देतील. त्यांना साथ देतील आपल्या वन-लाइनर्स ने सर्वांचे मनोरंजन करणारे डॅशिंग क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग. सुनील ग्रोवर डॉ एलबीडब्लू च्या भूमिकेत दिसतील व त्यांच्या बायकोच्या, गुगली च्या, भूमिकेत दिसणार आहे यावर्षीची बिग बॉस विजेती शिल्पा शिंदे. विनोदी प्रहसनांमध्ये अली असगर, सुगंधा मिश्रा, सुरेश मेनन, परेश गणात्रा यांचा समावेश असेल. या शोचं ग्लॅमर वाढवायला कमनीय अर्चना विजय आणि साजूक तुपातली शिबानी दांडेकर असणार आहेत.