रिव्हॉल्व्हर बाळगणार्‍या मध्यप्रदेशातील संशयीताला पोलीस कोठडी

0
यावल- तालुक्यातील वाघझिर्‍याजवळील सातपुडा पर्वतात लसनबर्डी आदिवासी वस्तीवरून अटक करण्यात आलेल्या राजु उर्फ राजाराम फुलसिंग बारेला (30,  चिरमिळ्या, ता.सेंधवा, जि.खरगोन मध्यप्रदेश) या संशयीताला शुक्रवारी दुपारी पोलीस पथकाने जिवंत काडतुस व रिव्हॉल्व्हरसह अटक केली होती. आरोपीला शनिवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची म्हणजे 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडी दरम्यान आरोपीने रिव्हॉल्व्हर कुठून व केव्हा आणले? आतापर्यंत शस्त्रांची कुठे तस्करी केली तसेच रॅकेटचा तपास लागण्याची शक्यता आहे. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.