हिंगणा रस्त्यावरील घटना ; रीक्षा चालकाविरुद्ध गुन्हा
बोदवड- भरधाव रीक्षातून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावरील हिंगणा गावाजवळ शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत आत्माराम पुंजाजी खुजबळ (55, महाळूंगी) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ज्ञानेश्वर मन्साराम खुजबळ (महाळूंगी जहागीर, ता.मोताळा) यांच्या फिर्यादीनुसार अॅपे रीक्षा (क्रमांक एम.एच.19 बी.जे.5718) वरील अज्ञात चालकाविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय प्रभाकर पाटील करीत आहेत.