रीक्षातून प्रवास करणार्‍या तरुणाचा भामट्याने मोबाईल लांबवला

जळगाव : शहरातील नेरी नाका परीसरातील स्मशानभूमीजवळ रीक्षात सबलेल्या तरुणाचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
राकेश सुकदेव शेळके (24, रा.चिंचोली, ता.जळगाव हा तरुण शुक्रवार, 8 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जळगावातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ रीक्षात बसलेला असताना ळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. या प्रकरणी शनिवार, 9 एप्रिल रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.