रीक्षातून प्रवास करणार्या वयोवृद्धांना लुटणारी जळगावातील टोळी पोलिसांच्या जाळ्यात
यावलसह पारोळ्यातील गुन्ह्याची कबुली : अनेक गुन्हे उघडकीस येणार
जळगाव : रीक्षातून प्रवास करणार्या वयोवृद्धांना गंडवत त्यांच्याकडील पैशांसह रोकड लांवबणार्या जळगावातील टोळीच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी यावलसह पारोळा पोलिस ठाणे हद्दीतील लुटीची कबुली दिली आहे. आरोपी वयोवृद्धांना रीक्षात बसवून नंतर त्यांना लुटत असल्याचे उघड झाले आहे. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रीक्षा गुन्ह्यात गेलेला माल एक लाख नऊ हजार 300 रुपये जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींना अटक
मोसीन खान उर्फ शेमड्या नूरखान पठाण (28, रा.पिंप्राळा हुडको, जळगाव), अरशद शेख हमीद शेख (23, रा.सुरेशदादा नगर, गेंदालाल मिल, जळगाव), शेख फिरोज शेख करीम (30, रा.गेंदालाल मिल, बिल्डींग नं. 28, रुम नं. 25, जळगाव), मनोज विजय अहिरे (31, रा.गेंदालाल मिल, बिल्डींग नं. 29, रुम नं. 40) जळगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र महाले, सुनील दामोदर, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.