जळगाव : रीक्षातून प्रवास करणार्या व्हॅन चालकाचे तिघांनी पाकिट लांबवत पळ काढल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी तरुणाच्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रीक्षातील संशयीतांनी पाकिट लांबवले
शहरतील समता नगरातील रहिवासी समाधान जाधव हे स्कूल व्हॅन चालक असून शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घरी जाण्यासाठी स्वातंत्र्य चौकातून एका रीक्षा बसले मात्र यापूर्वीच रीक्षात अन्य तीन प्रवासी बसलेले असताना दाटी होवू लागल्याने समाधान यांनी चालकास पुढे बसू देण्याची विनंती केली व चालकाने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रीक्षा थांबविली. समाधान उतरल्यानंतर त्याला पुढे बसू देण्याच्या आधीत रीक्षा चालकाने रीक्षासह पळ काढला. यावेळी समाधान यांना खिशातील पाकिट लंपास झाल्याचे लक्षात आले. पाकिटात अडीच हजारांची रोकड, आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स असल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत रीक्षा (क्रमांक एम.एच.19 व्ही.6592) वरील चौघांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला. तपास शरीफ शेख करीत आहेत.