रीक्षावर झाड पडल्याने चौघे जखमी

0

सावदा- सावदा-वाघोदा रस्त्यावर रीक्षेवर चिंचेचे झाड पडल्याने चौघे जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. रावेर येथून सावद्याकडे प्रवासी घेऊन येणारी रीक्षा (एम.एच.19 ए.व्ही 7265) ही वाघोदा गावाच्या पुढे श्रीकृष्ण पेट्रोल पंपाच्या थोड्या अंतरावर असलेल्या अण्णा सुनील पाटील यांच्या शेताजवळील पुलाजवळ आली असता रस्त्याचे कडेला असलेले पेटलेले चिंचेचे झाड या रीक्षेवर पडले. त्यात रीक्षा चालक अब्दुल इक्बाल अब्दुल गफ्फुर (40) सह रीक्षातील प्रवासी देविका प्रशांत लोखंडे (20, रा, सावदा), सुनंदा प्रकाश लोखंडे (58 रा. सावदा) व साहिल सचिन लोखंडे (6) असे चार जण जखमी झाले. लाकूड तस्करांकडून रस्त्यांवरील झाडे पेटण्याचे प्रमाण वाढले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.