रीक्षावर वीज तार पडल्याने जळगावातील दोघांचा मृत्यू

0

जळगाव- उच्च क्षमतेची विजेची तार तुटून रीक्षावर पडल्याने वीज प्रवाह उतरुन रिक्षाने पेट घेतला व या घटनेत इम्रान शेख फय्याज (वय 35, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) व इम्रान शेख इमाम खान (वय 30, रा.अक्सा नगर, जळगाव, मुळ रा.न्हावी, ता.यावल) या दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. बुधवारी रात्री पाऊस सुरू सतानाच दोन्ही मित्र मेहरुणमधील संतोषी माता चौकातील नागोरी चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेले. पावसामुळे ते दुकानात न जाता रिक्षात बसून चहा पित असताना रात्री 10.35 वाजता अचानक वादळामुळे भर पावसात उच्च क्षमतेची वीज वाहिनीची तार तुटली व ती रिक्षाच्या पुढील टायरवर पडली. लोखंडाला स्पर्श झाल्याने क्षणातच रिक्षाने पेट घेतला व टायरही फुटले. यावेळी कोणाला काही कळण्याच्या आतच रिक्षात बसलेले दोन्ही इम्रान होरपळले.