रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा यावल तालुका संपर्क दौरा

0

यावल- सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्र् अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली यावल तालुक्यातील कोळवद गावी आशिष मोरे यांच्या समवतेत तरुणांनी पक्षात प्रवेश केला. नंतर विरावली गावी प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्थेमार्फत भव्य दिव्य मंगल परीणय हॉल बनवण्यासाठी आठवले यांच्या आदेशान्वये जागेची पाहणी करण्यात आली. रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख सुदाम सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद तायडे, युवा तालुकाध्यक्ष संजय तायडे, पप्पू अडकमोल आदी उपस्थित होते.

सावखेड्यात अनेकांनी केला पक्षात प्रवेश
सावखेडा येथे अनेकांनी पक्षात प्रवेश केला प्रसंगी शाखा उदघाट्न ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. यावल तालुकाध्यक्ष अरुण गजरे यांनी शाखा उद्घाटन व पक्षात अनेकांचा प्रवेश सोहळा आयोजित केला. आदिवासी समाजाच्या यावल तालुकाध्यक्षपदी मुबारक तडवी यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात, खान्देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव, रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख सुदाम सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे यांनी मुबारक तडवी यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

यांची उपस्थिती होती
या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, खान्देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव, जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात, ज्येष्ठ नेते जयंत अडकमोल, रावेर लोकसभा प्रमुख सुदाम सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद तायडे, युवा अध्यक्ष संजय तायडे, आय.टी.सेल यावल तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तायडे, यावल तालुका उपाध्यक्ष योगेश वाघ, योगेश भालेराव आदी मान्यवरांचा सत्कार मुबारक तडवी यांनी केला. सूत्रसंचालन सागर गजरे यांनी तर आभार अरुण गजरेंनी मानले.