रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0

फैजपूर- रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या मागण्यांसाठी आंदोलन
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार शक्ती प्रदत्त समिती नेमून त्यांच्याद्वारे गावठाण अथवा ग्रामपंचायत मालकीचे जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य करीत असलेले अतिक्रमण कायम करून अतिक्रमण धारकास लाभ घ्यावा, जातीचे प्रमाणपत्र सादर करतेवेळी सेतू केंद्राचे मूळ दस्तऐवज स्कॅनिंग करणे अशी जाचक अटी सुरू करण्यात आली असून काहींचे दप्तर गहाळ होणे जीर्ण होणे किंवा महापुरात वाहून जाणे अशा कारणांमुळे अडचणींमुळे दस्तऐवज सांभाळून न ठेवणे इत्यादी अनेक कारणांमुळे अर्जदारांकडे झेरॉक्स प्रत आहे परंतु मूळ दस्तावेजाच्या अटीमुळे अर्जदार जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचीत राहत आहे त्यामुळे घरकुल सारख्या योजना व शासनाच्या इतर विविध योजनांचा जातीचे प्रमाणपत्राअभावी लाभ मिळत नाही. हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे. ही अट रद्द करण्यात यावी, घरकुलाचा लाभ, गॅस कनेक्शन घेण्याकामी, घरगुती मीटर कनेक्शन, बॅँकिंग व्यवहारासाठी व शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे मात्र यावल-रावेर तालुक्यात कार्डचा कृत्रिम टंचाई भासवून रेशनकार्ड वाटपात विलंब होत आहे. रेशनकार्डचे त्वरीत वाटप व्हावी, फैजपूर, मारुळ, न्हावी, वढोदा, पिंपरुड, विरोदा, लिधुरी, करंजी, ता.यावल येथील रेशनदुकानदार मनमानी पद्धतीने स्वस्त धान्य दुकान चालवित असून लाभार्थीस बिल पावती न देणे रेटबोर्ड न लावणे, स्टॉकची माहिती फलकावर न लावणे रेशनकार्ड वर धान्य न देणे इत्यादी मर्जीप्रमाणे काम करीत असल्याने त्यांची उच्च स्तरीय चौकशी होऊन परवाना रद्द करण्यात यावा, यासह सात मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या असून या निवेदनातील मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाअंती देण्यात आला. यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, रावेर तालुकाध्यक्ष विक्की तायडे, जगदीश कोचुरे, नरेंद्र तायडे, राजू तडवी, विकास सोनवणे, सुरेश तायडे, नितीन सपकाळे, राहुल आदिवाल, चांगो भालेराव, शेख अशरफ, शेख छब्बीर, दीपक गाढे, किरण ढिवरे हे धरणे आंदोलनात सहभागी झाले.