रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यंवंशीसह सात जणांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

भुसावळ- रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह सात जणांनी महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग केल्या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वरणगाव रोडवरील लाल मंदीराजवळ रविवारी दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास महिला घराच्या बाहेर बसली असतांना राजू भागवत सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, कीशोर सूर्यवंशी, रोहन राजू सूर्यवंशी, छोटू भागवत सूर्यवंशी (रा. संभाजी नगर, भुसावळ) संकेत पुंडलिक डोगरे (रा.पदमावती नगर, भुसवळ) आणि हर्षल कैलास सोनार यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करीत पती व सासूला शिव्या दिल्याचा आरोप आहे तर महिलेने आरडा ओरड केल्याने परीसरातील नागरिक तेथे जमा झाल्याने राजू सूर्यवंशी यांनी त्यांच्या गाडीतून (एमएच 19 एएक्स 333) व आपाची गाडी (एमएच 19 एयु 1533) यावर बसून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.