रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक व रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी रविवार, 16 जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने वरणगाव रोडवरील संभाजी नगरात आयोजित कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीनचाकी सायकल वितरण करण्यात आले. यावेळी खडसे यांनी सूर्यवंशी यांचा वाढदिवसानिमित्त गौरव करीत वॉर्ड क्रमांक 12 मध्ये केलेल्या विकासकामांबद्दल तोंड भरून कौतुक केले. दरम्यान, रविवारी दिवसभर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व सोशल मिडीयावरून सूर्यवंशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

वॉर्डाचा केला चौफेर विकास : माजी मंत्री खडसे
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी यावेळी राजू सूर्यवंशी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करीत केक भरवून शुभेच्छा दिल्या. जुन्या आठवणींना उजाळा देताना नाथाभाऊ म्हणाले की, गत दोन वर्षांपूर्वी या प्रभागात आल्यानंतर रस्ते नव्हते, सांडपाण्याची व्यवस्था नव्हती मात्र आता वॉर्ड क्रमांक 12 मधील रस्ते चकचकीत झाले असून संपूर्ण वॉर्डात स्वच्छता दिसून आली. वॉर्डात अनेक विकासकामे पूजाताई सूर्यवंशी यांनी केल्याचे त्यांनी सांगून त्यांच्या कामाचे कौतुक करीत विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व असल्याचा गौरव केला शिवाय पुन्हा नगरसेविका म्हणून त्या निवडून याव्यात या सदिच्छाही व्यक्त केल्या. वाढदिवसानिमित्त राजू सूर्यवंशी यांनी गरजू दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल वाटपाच्या उपक्रमाचे त्यांनी तोंड भरून कौतुक करीत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दिव्यांग बांधवांना सायकल वाटप
सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरणगाव रोडवरील संभाजी नगरात आयोजित कार्यक्रमात पंधरा दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकलचे माजी मंत्री एकनाथराव खडसे व रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगरसेविका पूजा सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. दरम्यान, आर.एस.ग्रुप व सोनुराज कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष रोहन राजू सूर्यवंशी तसेच सर्व पदाधिकार्‍यांनी राजू सूर्यवंशी यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी सूर्यवंशी यांच्याहस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, पुरूषोत्तम नारखेडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, अनिकेत पाटील, दिनेश नेमाडे, लक्ष्मण जाधव, शरद सोनवणे, पप्पू सुरडकर, शरद सोनवणे, बाळू सोनवणे, बाळा मोरे, यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पप्पू सुरडकर यांनी केले.

तरुणांकडून सूर्यवंशी यांचे चौका-चौकात स्वागत
तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या राजू सूर्यवंशी यांचे रविवारी दिवसभरात वरणगाव रोड भागातील चौका-चौकात तरुणाईकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी औक्षण करून केक कापून व भला मोठा बुके देवून त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला तसेच उदंड आयुष्यासाठी कामनाही करण्यात आली.