जळगाव : निरामय आरोग्य आणि रक्तदान सेवा हे काळाची गरज असून समाज व्याधीमुक्त असावा या करीता मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या माध्यमाने मुक्ती फाऊंडेशनतर्फे नागरिकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन अॅड. रोहिणी खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबीरात महिलांमधील हिमोग्लोबीनचे प्रमाण तपासण्यात आले. तसेच गरजु महिलांना आमदार राजु मामा भोळे यांच्यातर्फे शक्ती वर्धक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
रक्तवाढीसाठी गोळ्याचे वाटप
शिबीरात इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे रक्त वाढीसाठी गोळ्या वाटप करण्यात आले. जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालय आणि इंडो अमेरिकन हॉस्पिटलतर्फे ह्दय विकार, रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदुच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. इंडियन रेडक्रॉस सोसायटीतफर्ें आयोजित रक्तदान शिबीरात 66 युवकांनी रक्तदान केले. शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले होते. यावेळी आयोजक मुकुंद गोसावी, अतुल बढे, रुईखेडा, चिखली, घोडसगाव ग्रामस्थ हजर होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी मुक्ती फाऊंडेशनने प्रयत्न केले.