मुक्ताईनगर– तालुक्यातील रुईखेडा येथील भारतीय जनता पार्टीचे सरपंच काशिनाथ एकनाथ नारखेडे तसेच माजी सरपंच नवाब हसन वंजारी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. प्रसंगी नाशिकचे माजी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड व जळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख जळगाव चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याचवेळी उचंदा येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक ईगळे, जीवन इंगळे, गजानन जाधव, गोकुळ गायकवाड, मनोज इंगळे, ज्ञानेश्वर बोदडे यांच्यासह 25 कार्यकर्त्यांनीही सेनेत प्रवेश केला. शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा संघटक अफसर खान, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र तळेले, रुईखेडा येथील माजी सरपंच चंद्रकांत बढे, समाधान पाटील, मोहन पाटील, गजानन चौधरी, कृष्णा चौधरी, हरीभाऊ पाटील, गंभीर पाटील, बबन खा, शरद बडे, वासुदेव नारखेडे, नंदकिशोर नारखेडे, दिनकर पाटील, प्रकाश नाईक, सुनील पाटील, चंद्रकांत तायडे तसेच चिखली येथील सरपंच राजेंद्र कांडेलकर, मुक्ताईनगर येथील विठ्ठल तळेले, राजू हिवराळे, जीवराम कोळी, भास्कर पाटील, पंकज पांडव, सतीश नागरे, प्रशांत बालशंकर, प्रवीण चौधरी, प्रफुल्ल पाटील, शुभम तळेलेसह असंख्य शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.