नेरळ (कांता हाबळे) : जनतेचे स्वास्थ्य चांगल रहावे, रुग्णांना त्वरीत माफक दरात उपचार मिळावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबिवल्या जात आहेत. गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी 108 नंबरची विशेष रुग्णवाहिकेची सोयही शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. मात्र असे असताना कर्जत उपजिल्हा रुग्णालय मात्र याला अपवाद ठरले आहे. येथील रुग्णांकडून रुग्णवाहिका नेण्यासाठी प्रतिकिलोमीटर 15 रुपये इतका खाजगी टुर्स अॅडण्ड ट्रॅव्हल्स सारखा दर आकारला जात आहे. गोरगरीब रुग्णांना हा दर परकडणारा नसल्याने ही रुग्णवाहिका आहे की प्रवासी व्हॅन अशी संतप्त प्रतिक्रीया रुग्णांमधून उमटत आहे.
कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. कर्जत तालूका हा आदिवासी बहुल तालूका असल्याने येथील गोरगरीब , सर्वसामान्य लोक उपचारासाठी या रुग्णालयात येतात. मात्र येथे कायमच तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता तसेच अप्ाूरा औषध प्ाूरकठा आणि अद्ययावत सेवा उपलब्ध नसल्याने आणि काही केळेस डॉक्टर जबाबदारी टाळण्याच्या हेतूने येथे उपचार करण्याऐवजी अन्य रुग्णालयात रुग्णाला हलविण्यास सांगतात. रुग्णाला अन्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णकाहिकेची आकश्यकता भासते. मात्र अशा केळेसच रुग्णकाहिका उपलब्ध नसते. तर कधी रुग्णकाहिकेचे चालकच जागेकर नसतो. त्यामूळे रुग्णांच्या नातेकाईकांची तारांबळ उडते. आणि रुग्ण काहिका पाहिजेच असेल तर खाजगी रुग्णकाहिका उपलब्ध करुन दिली जाते. क पंधरा रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारला जातो. फक्त पिकळया रेशनिंग कार्ड धारकांना मोफत सेका उपलब्ध करुन दिली जाते. परंतु सगळयाच गोरगरीब रुग्णांकडे पिकळे कार्ड असतेच असे नाही. त्यामूळे अशा रुग्णांच्या नातेकाईकांची रुग्णकाहिकेसाठी पैसे गोळा करताना चांगलीच दमछाक होते. तरी रुग्णांची होणारी कुंचबणा तसेच होणारी हेळसांड थांबिकण्यासाठी मोफत रुग्णकाहिका उपलब्ध करुन द्याकी अशी मागणी होत आहे.
रुग्णालयात लाकण्यात आलेल्या फलकाकर ही रुग्णकाहिका प्रसुतिच्या रुग्णांसाठी नाही असे स्पष्ट लिहिले आहे. त्यामूळे गर्भकती महिलांची मोठी कुचंबणा तसेच गैरसोय होऊ शकते. तालूक्यातील एकमेक मुख्य उपजिल्हा रुग्णालय असल्याने येथे अद्यायाकत, सुसज्ज अशा किमान दोन रुग्णकाहिका असणे अपेक्षित आहे.
– मनोज घारे (सामाजिक कार्यकर्ते)