शिरपूर । रूग्णसेवा ही ईश्वरसेवा असल्याने त्यातून खरा आनंद प्राप्त होतो. आईवडिल व वडीलधारी मंडळींचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. सर्वांना चांगले आरोग्य लाभण्यासाठी आरोग्य शिबिरांमधून काम सुरु आहे. असंख्य रुग्णांना शिबिराचा चांगला लाभ झाला असून ते आनंदाने जीवन व्यतीत करीत आहेत. इंग्रजी शाळांमधून विद्यार्थ्यांना घडवून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्व समाजाला न्याय देण्याचे काम सातत्याने तालुक्यात सुरु आहे. शिरपूर पॅटर्नचे पाण्यासाठीचे काम अविरत सुरु असून तालुक्यातील प्रत्येक भागात मुबलक पाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डोळयांच्या शिबिरानंतर अजून काही शिबिरांचे आयोजन करुन इतर आजारांच्या समस्या दूर केल्या जातील, असे प्रतिपादन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास आ. काशिराम पावरा, शंकरा आय हॉस्पीटलचे डॉ. अजय ठाकूर, डॉ. राजन मुक्तान, जुने भामपूर येथील विठ्ठल पाटील, सरपंच बाळासाहेब पाटील, माजी सरपंच प्रताप पाटील, पं.स. उपसभापती संजय पाटील, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, आर.सी. पटेल मेडिकल फाऊंडेशनचे सचिव गोपाल भंडारी, माजी पं.स. उपसभापती दीपक गुजर, बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील (बोराडी), सूतगिरणीचे संचालक धनंजय पाटील, मर्चंट बँक संचालक नवनीत राखेचा, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, कृउबा संचालक नरेंद्र पाटील, प्रियदर्शिनी ऑफसेटचे व्हा. चेअरमन राजेश भंडारी, पिपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, जळोदचे आनंद भंडारी, डॉ. अमृत महाजन, राजेंद्र देवरे, नवेश महाजन, विनोद शर्मा, भालेराव माळी उपस्थित होते.
175 जणांवर होणार शस्त्रक्रिया
जुने भामपूर येथे आर.सी. पटेल मेडीकल फाऊंडेशनच्यावतीने मोफत मोतिबिंदू, नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात 382 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात 175 जणांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान, आ. काशिराम पावरा, विठ्ठल पाटील, प्रताप पाटील, सरपंच बाळासाहेब पाटील, माजी पं.स. उपसभापती दीपक गुजर यांनीही मनोगत व्यक्त केले.