यावल । फैजपूर येथे 2 ऑक्टोंबर रोजी होणार्या महाआरोग्य शिबिराकरीता रुग्णांनी प्राथमिक तपासणीसाठी रुग्णांची माहिती घेण्याचे काम येथील ग्रामिण रूग्णालयात सुरू करण्यात आले आहे. संबधीत रुग्णांचे मोबाईल क्रमांक तसेच त्यांची प्राथमिक तपासणी कधी होईल या संबधीत माहिती त्यांना दिली जाणार आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती वार्षिक समारोपचा कार्यक्रमानिमित्त फैजपूर येथे होणार्या महाआरोग्य शिबिरात रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहे. यात लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत यासाठी रुग्णांची प्राथमिक नोंदणी यावल ग्रामीण रुग्णालयात केली जात आहे.
शिबिरासंदर्भात दररोज बैठका
डॉ. दिनेश देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अभिजीत नन्नवरे यांनी काही रुग्णांची तपासणी करीत त्यांची माहिती संकलीत केली आहे. या रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी होईल व नंतर महा आरोग्य शिबिरात त्यांच्या विविध तपासणी पुर्ण करून उपचार्थ पाठवले जाणार आहे. पालिकेचे गटनेेता राकेश फेगडे, नगरसेविका देवयानी महाजन, पौर्णिमा फालक, धीरज महाजन, राजेंद्र फालक यांनी आप आपल्या प्रभागात या आरोग्य शिबीरासंर्दभात माहिती देण्याकरीता बैठका घेणे सुरु केले आहे.