रुग्णांना फळे वाटप

0

दौंड । सम्यक प्रतिष्ठान व पँथर माशाळ प्रतिष्ठानच्या वतीने दौंडमधील ग्रामीण रूग्णालय व अ‍ॅशवूड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच गुप्तेश्वर आश्रमशाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण, संत कबीर मागासवर्गीस विद्यार्थी वसतिगृहात शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी साहेबराव पोळ यांनी बुद्धवंदना घेतली. याप्रसंगी नरेश डाळिंबे, मकरंद पवार, डॉ. प्रा. भीमराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान करणत आले. यावेळी विकास कदम, सिद्धार्थ माशाळ, पोपट शिंदे, राजू जाधव, आनंद कड, राजू आढाव, पप्पू बनसोडे, श्याम नवगिरे, शीतल मोरे, सुजाता कदम, व्ही,एल. कदम, अण्णा आठाव उपस्थित होते.