रुग्णालयात मरणासन्न अवस्थेत असलेल्या जन्मदात्या बापाला ओळखण्यास मुलाचा नकार

0

पिंपरी-सरकारी १०८ रुग्णवाहिकेने बेवारस आजारी व्यक्ती म्हणून रुग्णालयात भरती केले. एका सामाजिक संस्थेच्या देखभालीत उपचार झाले. दीड महिन्यानंतर त्या व्यक्तीला मुलगा असल्याचे समजले. मुलाशी संपर्क केला असता जन्म देणा-या या बापाची जबाबदारी घेण्यास मुलाने स्पष्ट नकार दिला. अभियंता असलेल्या एका मुलाने मृत्यूशी दोन करणा-या बापाला ओळखण्यासही नकार दिला.

प्रभाकर नारायण फेरे (वय ५५) मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तावरसखेडा या गावचे आहेत. त्यांना ६ मे रोजी बेशुद्धावस्थेत पडल्याने भोसरीमधून वायसीएम रुग्णालयात आणले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर जाधव, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, रियल लाईफ रियल पीपल संस्थेचे एच. ए. हुसेन यांच्या मदतीने त्यांच्यावर मागील दीड महिन्यांपासून उपचार सुरु आहेत.

पूर्णतः बरे झाल्यानंतर त्यांना आता घरी सोडण्याची तयारी झाली आहे. मात्र, बेवारस म्हणून नोंद झालेल्या प्रभाकर यांच्या नातलगांचा नेमका शोध लागला नाही. तो शोध घेत असताना रुग्णालयाला व रियल लाईफ रियल पीपल संस्थेला त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असल्याचे समजले. मोठा मुलगा भोसरीमधील एका कंपनीत काम करतो. तर लहान मुलगा औरंगाबादमध्ये अभियंता म्हणून काम करतो. मुलीचे लग्न झाले असून ती लातूर येथे राहते. तिघांपैकी लहान मुलाचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क केला असता, लहान मुलाने बापाची जबाबदारी घेण्यास साफ नकार दिल्याचे रियल लाईफ रियल पीपल संस्थेचे एच. ए. हुसेन यांनी म्हटले आहे.