भुसावळ। पालिका प्रशासनातर्फे थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम राबविण्यात येत असून रविवार 2 रोजी म्युनिसिपल पार्कमधील निलवसु हॉस्पिटल व त्या आवारात असलेल्या दोन दुकानांवर कर थकबाकी असल्याने सकाळी 11 वाजता सील लावून कारवाई करण्यात आली.
याप्रसंगी अख्तर खान, शेख परवेज, महेश चौधरी, राजेंद्र चौधरी, गोपाल पाली, किरण मंदवाडे, अनिल मंदवाडे, आर.व्ही. राठोड, प्रदिप पवार, राजू टाक, शाम गिरी, विजय जठार, किशोर धुप्पड, रमेश सपकाळे, संजय भिरुड, प्रमोद मेढे उपस्थित होते.