नंदुरबार ।ज्या वेळी शासकीय यंत्रणेला सांगुन ही काम होत नाही त्यावेळी लोक रस्त्यावर येऊन ते काम करून दाखवतात. उपजिल्हा रुग्णालयासमोरील महामार्गावर भरधाव वेगाने येणारे जडवाहने खड्डामुळे चुकीच्या दिशेने निघायचा प्रयत्न करतात. तसेच खड्डा चुकवत समोरून येणारा वाहनशी जोरदार धडक बसायची व अनेक अपघात होत होते. यामुळे मोठी अप्रिय घटनेची शक्यता होती. तसेच नवापूर शहर तालुक्यातून येणार्या रुग्णांना रूग्णालयात येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता.
शासनाकडे केली होती वारंवार तक्रार
महामार्ग अधिकारी यांना सांगून ही उपजिल्हा रुग्णालया समोरील महामार्गावर असलेला तो जीवघेणा खड्डा बुजला जात नव्हता. अखेर उपजिल्हा रुग्णालय नवापुर येथील बी.एस.भंडारी. 108 रूण्णवाहिकेचे पायलट लाजरस गावीत, प्रकाश गावीत, चंद्रकांत पावरा, सोमा कोकणी, याकुब गावीत, सतीश गावीत, हर्षल गावीत या हे सर्व कर्मचारी वर्ग एकत्र आले. तो खड्डा बुजण्याचे ठरवले या सर्वानी हातात फावडा, तगारी, कुदड घेऊन माती आणुन तो जीवघेणा व अपघाती खड्डा बुजून एक चांगले सकारात्मक काम करून लोकांना व शासकीय यंत्रणेला चांगला संदेश दिला आहे.