पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा मयताची पत्नी, आईचा आरोप ः सीआयडी चौकशीसह दोषींवर कारवाईची मागणी
जळगाव : काकाने दाखल केलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात सुनील भागवत तारु (40, रा.चांगदेव, मुक्ताईनगर) या तरुणाला वारंटमध्ये पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडीत असताना त्याची प्रकृती खालावली तर दुसरीकडे त्याच गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली. यादरम्यान पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरु असतांना सुनीलचा शनिवारी रात्री 8.10 वाजता मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्यानेच सचिनचा मृत्यू झाला असून याप्रकरणा सीआयडी चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी पोलिसांना तत्काळ अटक करुन कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मयत सचिनच्या पत्नी, आई, मेव्हण्यांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयासमोर रास्तारोको आंदोलन केले. कस्टडीत असतांना मृत्यू झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायाधीशांच्या निर्णयानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी उशीरा शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
सुनील तारु या तरुणाविरुध्द काही वर्षापूर्वी काकाने हाणामारीचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सुनील हा तारखेवर हजर झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुध्द अटक वारंट बजावले. या वारंटनुसार पोलिसांनी त्याला 1 मार्च रोजी शेतातून अटक केली. भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. ज्या गुन्ह्यात सुनील याला अटक केली, त्या गुन्ह्याचा निकाल गुरुवारी लागला. त्यात त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. दुसरीकडे प्रकृती खालावल्याने भुसावळ कारागृह प्रशासनाने बुधवारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असल्याने तो गुरुवारी न्यायालयात हजर राहू शकला नाही, तर दुसरीकडे न्यायालयाने त्याच गुन्ह्यात सुनीलची निर्दोष मुक्तता केली.
पोलीस अधीक्षकांना दिले होते निवेदन
या काळात पोलिसांनी कडू तारु यांच्या सांगण्यावरुन सुनीलला मारहाण केली, म्हणूनच त्याची प्रकृती खालावली आहे. यापूर्वीदेखील कडू यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी त्याला मारहाण केली होती, असे नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पत्नी, आई, बहिण व मेहुणे यांच्यासह इतर नातेवाईकांनी आजदेखील रुग्णालयात आक्रोश केला. मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी नातेवाईकांचे म्हणणे जाणून घेत सुनील तारु याच्या प्रकृतीची माहिती घेतली. तरूणाला न्याय मिळावा,अशी आग्रही मागणी केली. दरम्यान रात्री सुनील याची प्रकृती अधिक गंभीर झाली. त्याच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यानंतर 08.10वाजता त्याचा मृत्यू झाला.
न्यायालय आले सिव्हीलमध्ये कुटूंबीय नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतल्यावर, जिल्हा रुग्णालयात निरीक्षक अकबर पटेल यांनी कुटूंबीयांची समजुत घालण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आटोकाट प्रयत्न चालवले होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्या पोलीसांनी तातडीने मॅजिस्ट्रेट निवास्थान गाठून घटनेचे गांभीर्यपुर्वक माहिती दिल्यावर न्या. डी.बी.साठे यांनी शवविच्छेदनगृहात येवुन मृतदेहाची पहाणी केल्यावर पुढील कारवाई बाबत पोलिसांना सुचना केल्या.
मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा
दरम्यान, यावेळी जिल्हा रूग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. पत्नी मंगला तारू, आई गुंफाबाई तारू, भावना आणि मोनाला या दोन मुली आणि मुलगा यश आणि दोन बहिणी असा परीवार आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पटेल यांचा मयत सुनिल यांच्या नातेवाईकांशी भेट घेतली. मात्र पोलीसांच्या मारहाणीमुळे तरूणाचा मृत्यू झाला आहे असा आरोप करत जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती.
आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
सुनील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे, संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत मयत सुनिलच्या पत्नी मंगला आणि आई गुंफाबाई याच्यासह इतर नातेवाईक, व जळगावातील समाजबांधवांनी जिल्हा रुग्णालयासमोर रस्त्यावर रविवारी सकाळी 10 वाजता रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे दोन्ही बाजुच्या रहदारीचा रस्ता बंद केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन,
जिल्हापेठ पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले.