मुंबई- शेअर मार्केटच्या सुरुवातीला आज पुन्हा रुपयातील घसरण पाहावयास मिळाली. रुपयाची घसरण होत असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७२.४५ इतके आहे.
सेन्सेक्स ३८ हजाराच्या खाली आले आहे तर निफ्टी ११ हजार ४५० च्या जवळपास आहे. आयटीसी, एचयूएल, हीरो मोटोकॉर्प, कोटक बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि टीसीएसचे शेअर खाली आले आहे. सोमवारी सेन्सेक्स 468 अंकांनी खाली येऊन ३७ हजार ९२२ वर तर निफ्टी १५१ अंकांनी खाली येऊन ११ हजार ४३८ वर बाजार बंद झाला होता.