विजयबापू कारण तुम्ही तशी मदत कोणालाही केली नसेल किंवा त्या कुटुंबाची काय परिस्थिती असू शकते हे तुम्हाला जाणवली नसेल. सुप्रियाताई यांच्या माध्यमातून कात्रज येथे सहा पदरी ब्रिज साठी 223 कोटी मंजूर झालेत. त्याची माहिती आपण घ्यावी. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत येताना अनेक अडचणी होत्या. त्यांची अडचण दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून 25,000 सायकली मतदारसंघात वाटण्यात आल्या आहेत. कदाचित तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही पण त्या मुलींना नक्कीच कळेल ज्या दोन दोन किलोमीटर चालत शाळेत येत होत्या.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून 200 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. त्याचीही माहिती तुम्ही घ्या. 14 कोटी 70 लाख रुपये फक्त रेल्वेसाठी तुमच्या तालुक्यात मंजूर झाले आहेत. याची माहिती तुम्ही घेतली तर बरं होईल असो लिस्ट मोठी आहे तुम्ही त्याची माहिती घ्यावी सोबत मी काही फोटो पाठवले आहेत ते पाहावे म्हणजे तुम्हाला थोडीफार लक्षात येईल आणि तुमचे डोळे उघडतील ही अपेक्षा.
आता थोडं तुमच्या कामांकडे वळूयात तुम्ही महाराष्ट्राचे जलसंपदा राज्यमंत्री आहात. महाराष्ट्रात तुम्ही मंजूर केले दोन चार प्रकल्प तुम्हाला सांगता येतील का? गुंजवणीचे पाणी एका सहीवर आलं आहे असे तुम्ही मागच्या पाच वर्षापूर्वी बोलत होतात. 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाच टक्के राहिले आहे असेही तुम्ही बोलत होतात त्याचं काय झालं दहा वर्षात तुम्हाला पाच टक्के कामही पूर्ण करता आले नाही का याचे उत्तर आम्हीच नव्हे तर पूर्ण पुरंदर ची जनता मागत आहेत त्याबद्दल तुम्ही थोडे बोलताल का ?, तुमच्या तालुक्यात भीषण दुष्काळ आहे लोकांना प्यायला पाणी नाही. त्यांनी जनावरे विकून टाकली आहे एक मंत्री म्हणून तुम्ही पुरंदरचा दुष्काळ मिटवण्यासाठी काय प्रयत्न केले? पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी काय प्रयत्न केले का याचे उत्तर आम्हाला हवे आहे.
पुरंदरमध्ये रोजगाराची गरज असताना तुम्ही कारखाना नगरमध्ये का काढला? याचे लोकांना उत्तर सापडत नाहीये. तुम्ही पहिल्यांदा आमदार होणार होता. त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की पुरंदर मध्ये आम्ही कॉलेज काढणार ते कॉलेज कुठे आहे आणि कुठे काढले आहे? याची माहिती तुम्ही दिली तर बरं होइल. तुम्ही एमआयडीसी आणणार होता आणि लाखो तरुणांना रोजगार देणार होता. त्याचं काय झालं? असे अनेक प्रश्न पुरंदरमध्ये आहे ज्याचे उत्तर तुम्ही द्यावे हे आम्हाला अपेक्षा आहे.
स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी केवळ पवार साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करणे तुम्हाला शोभत नाही आणि सुप्रियाताई सुळे यांनी पवार साहेबांचे नाव वापरून कधीही राजकारण केले नाही. जर तसं असेल तर ते तुम्ही आम्हाला दाखवावे. ज्यांना स्वतःचे कर्तृत्व असते त्यांना दुसऱ्याचे नाव घेऊन राजकारण करण्याची गरज नसते. ज्याप्रमाणे तुम्हाला पवार साहेबांचे नाव घेऊन मते मिळवण्याची हौस आहे. शरद पवारांच्या नावाचा एवढा वापर तर सुप्रियाताई यांनीही केला नसेल. कदाचित तुमचे कर्तृत्व कमी पडत असेल. राजकारण कराच पण त्याचा उपयोग जनतेसाठी कसा होईल याचा विचार करा केवळ विरोधाला विरोध म्हणून सुप्रियाताईंबद्दल खालची भाषा वापरली तर आम्ही ते सहन करणार नाही, याची नोंद आपण घ्यावी ही विनंती, असे चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे.