रानकवी ना.धो.महानोर यांच्या उपस्थिती
अमेरिकेतील संस्थेकडून प्रतिष्ठित नवीन अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्काराचे आयोजन
शेंदूर्णी – येथून जवळच असलेल्या मेणगाव या गावची कन्या रुपाली पाटील यांना एसडब्ल्यूई सोसा.ऑफ वुमन इंजिनिअर्स या जगातील सर्वात मोठ्या अमेरिकेतील संस्थेकडून प्रतिष्ठित नवीन अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल २० ऑक्टोंबर रोजी जन्मगावी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे होते तर प्रमुखअतिथी म्हणून पद्मश्री कविवर्य ना.धो.महानोर, जामनेर नगराध्यक्षा साधनाताई महाजन, भोकरदन नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, माजी जि.प.सदस्य संजय गरुड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, उत्तमराव थोरात, प्रकाश झंवर, मनसे महिला जिल्हा उपाध्यक्ष भक्ती कुलकर्णी, माजी उपसरपंच नारायण गुजर, अमृत खलसे, पत्रकार विलास अहिरे, मनसेचे डॉ. विजयानंद कुलकर्णी, मुक्ताबाई चौधरी इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
रूपाली पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा
सत्काराला उत्तर देतांना रुपाली पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पालकांना मुलींना मुक्त शिक्षण घेऊ दिल्यास त्या सुध्दा आई वडिलांचे व स्वत:चे नाव रोशन करू शकतात. म्हणून बुरसटलेले विचार सोडून मुलींना योग्य शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे आवाहन केले. होतकरू मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. मुख्य अतिथी कविवर्य ना.धो.महानोर यांनी आपल्या भाषणात रुपाली पाटील यांच्या जन्मगावी होणाऱ्या सत्काराचे कौतुक केले व ग्रामिण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हुशार असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, असे सांगितले. मेणगावचे माजी सरपंच व रुपाली पाटीलचे वडील सुरेश पाटील यांनी आजच्या सत्कार समारंभ आयोजित करून जो सत्कार घडवून आणला त्याबद्दल पी.गणेश व त्यांच्या मित्र परिवाराचे आभार मानून गावकऱ्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यांनी केला सत्कार
यावेळी शेंदूर्णी ग्रामस्थांचे, राणी लक्ष्मीबाई, पारस जैन, गरुड पतसंस्थेच्या संजय गरुड, गोविंद अग्रवाल, प्रकाश झंवर, उत्तम थोरात, नारायण गुजर, शांतीलाल जैन यांनी सत्कार केला. मनसेच्या व गुरुकुल इंग्लिश मिडीयमकडून डॉ.विजयानंद व भक्ती कुलकर्णी यांनी सत्कार केला. जामनेर नगरपरिषदेकडून नगराध्यक्षा साधना महाजन व नगरसेवक महेंद्र बाविस्कर यांनी सत्कार केला. यावेळी मेणगाव ग्रामपंचायततर्फे सरपंच बाळू धुमाळ व त्यांचे सहकारी यांनी सत्कार केला.