पुणे । रुपी बँकेवर अर्थिक निर्बंध लावून सुमारे साडेचार वर्षांचा कालावधी होऊन देखील शासन व प्रशासनाच्या पातळीवरील इच्छाशक्तीच्या अभावामुळे राज्यातील सात लाख खातेदारांचा जीव टांगणीस लागला आहे. येत्या शुक्रवारी (दि.11) अलका टॉकीज चौकात मानवी साखळी करून रुपी बँकेच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे पुणेकर नागरीक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेस आतापर्यंत 9 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदत येत्या 21 ऑगस्ट रोजी संपणार आहे. आतापर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये रुपी बँकेच्या खातेदार-ठेवीदारांना दिलासा देण्यात शासन अपयशी ठरल्याचा आरोप थत्ते यांनी केला आहे. रुपीच्या खातेदारांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून सकारात्मक तोडगा तातडीने काढणे आवश्यक आहे.