मुंबई (संजय घावरे) : आपल्या अनोख्या फॅशनमुळे तसेच काव्यरचनांमुळे कायम चर्चेत राहणारे सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)चे सर्वेसर्वा रामदास आठवले ‘राष्ट्र’ या आगामी मराठी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहेत. या चित्रपटात त्यांच्या जोडीला स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही अभिनय केला आहे.
इंदर इंटरनॅशनलची प्रस्तुती असलेल्या ङ्गराष्ट्रफ या आगामी मराठी चित्रपटात आठवले आणि शेट्टी आपापल्या वास्तवातील व्यक्तिरेखांमध्ये चमकणार आहेत. दिग्दर्शक इंदरपाल सिंग यांच्या ङ्गराष्ट्रफ या चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत हजेरी लावताना खूप आनंद होत असल्याची भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. याबाबत आपले मत व्यक्त करताना आठवले म्हणाले की, या चित्रपटाची कथा आजच्या प्रवाहातील चित्रपटांपेक्षा खूप वेगळी आहे. घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वाटचाल करणार्या दलित जनतेसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. जातियवादावर प्रहार करणार्या या चित्रपटामध्ये आपण तमाम दलित जनतेच प्रतिनिधीत्व करण्यासाठी सहभागी झालो असल्याचेही आठवले म्हणाले.
ङ्गराष्ट्रफमध्ये काम करण्याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, आजवर बर्याच पंजाबी चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन करणार्या इंदरपाल सिंग यांनी मराठीकडे वळताना अनादीकालापासून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात धगधगत असलेला ज्वलंत विषय निवडला आहे. अशा प्रकारच्या समाजोपयोगी विषयावर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती होणे ही आजच्या समाजाची गरज आहे. ङ्गराष्ट्रफचे दिग्दर्शन करणार्या इंदरपाल सिंग यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन आणि संकलनही केले आहे. अमराठी असूनही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अचूक प्रश्न त्यांनी चित्रपटात मांडले आहेत.
या चित्रपटाची कथा आरक्षण कोटा आणि जातियवाद यांवर आधारित आहे. चित्रपटाचे निर्माते बंटी सिंग यांच्या म्हणण्यानुसार आठवले आणि शेट्टींसारख्या नेत्यांची उपस्थिती असणे ही ङ्गराष्ट्रफच्या कथेची गरज होती. सिंग म्हणाले की, या चित्रपटात दोघांच्याही व्यक्तिरेखा वास्तववादी आहेत. आठवले हे दलित सुप्रिमोच्या भूमिकेत आहेत, तर शेट्टी त्यांच्या मूळ व्यक्तिरेखेत म्हणजेच स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनच दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांनी केलेल्या आंदोलनांचाही समावेश आहे. दोघांनाही चित्रपटाची कथा खूप आवडली आणि त्यांनी खास वेळ काढून मनापासून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. त्यांच्या जोडीला विक्रम गोखले, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, रोहिणी हट्टंगडी, रीमा लागू, संजय नार्वेकर, यतिन कार्येकर, दिपक शिर्के, गणेश यादव आणि सिया पाटील या कलाकारांनीही या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचे फार जुने नाते आहे. या अनोख्या नात्यामुळे काही कलाकारांना राजकारणात जाण्याची ओढ लागते, तर काही राजकारण्यांना स्वत:ला रुपेरी पडद्यावर पाहण्याचे वेध लागतात. यामुळेच आजवर काही राजकारण्यांनी रुपेरी पडद्यावर हजेरी लावली आहे. सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांनी ङ्गदेवताफ आणि ङ्गनवरा बायकोफ या चित्रपटांमध्ये अभिनय केलाच, त्यासोबतच या चित्रपटांची निर्मितीही केली होती. वसंतदादा पाटील यांनी ङ्गपंढरीची वारीफ या चित्रपटात अभिनय केला होता. याखेरीज दिग्दर्शक सतिश रणदिवे यांच्या ङ्गसुरवंताफ या चित्रपटात बबनराव घोलप यांनी नायकाची भूमिका साकारली होती. सध्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुनिल देशमुख यांनीही एकेकाळी चित्रपटामध्ये हिरोची भूमिका केली होती. दादा कोंडेकेंच्या ङ्गपांडू हवालदारफमध्ये प्रमोद नवलकर पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग केले होते. याशिवाय शरद पवार यांनीही एका चित्रपटात शेतकर्यांच्या प्रश्नाद्वारे लक्ष वेधून घेतले होते.