जळगाव। राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा अंतर्गत मिळालेल्या अर्थसहाय्यातून राज्यात चार समावेशी शिक्षण संसाधन केंद्रे कार्यरत आहे. चौथे केंद्र हे उत्तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातात सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान केंद्राचे माजी संचालक तथा शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते शनिवारी 8 रोजी करण्यात आले. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे नव्याने नामकरण करण्यात आलेल्या ज्ञान स्त्रोत केंद्राच्या इमारतीत हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. दिव्यांगाना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षित कर्मचार्यांची नेमणूक विद्यापीठामार्फत करण्यात आली असून संसाधन केंद्र सर्व दिव्यांग घटकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
दिव्यांग घटकांसाठी विनामूल्य खुले असणार
दिव्यांग व्यक्तींना असेसटिव्ह टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून सहाय करणे, उच्च शिक्षणातील त्यांचे प्रमाण वाढविणे विविध जाणीव जागृती कार्याशाळांचे आयोजन करणे हे आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. अं. बा. चौधरी, प्रा. पी. पी. माहुलीकर, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) चे सल्लागार प्रा.अंबादास मोहिते, इशरत जहाँ, डॉ. आर. पी. भावसार, दिलीप पाटील, यजुर्वेद्र महाजन, पद्माकर इंगळे तसेच विद्यापीठातील सर्व प्रशाळांचे संचालक, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी इंजि.सी.टी.पाटील, एस. आर. पाटील, आर. आय.पाटील यांच्या सह रुसा समावेशी शिक्षण संसाधन केंद्राचे कर्मचारी, बांधकाम व ज्ञान स्त्रोत केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.