रूई येथे विमान कोसळले; पायलट जखमी

0

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील रूई इथं विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या झालेल्या अपघातात विमानाचा प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाला असून बाबीर विद्यालयाजवळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धार्थ टायटस असं जखमी पायलटचं नाव आहे. बारामती येथील हे विमान होते.

इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ३५०० फूट उंचीवरून हे विमान कोसळले. पायलट सिद्धार्थ याला स्थानिकांनी रूई येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला बारामती इथं हलविण्यात आलं आहे.