रूग्णवाहिकेतुन 2 लाखांचा मद्यसाठा जप्त

0

नाशिक । महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांना काही दिवस बाकी असतांना सकाळीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात एका रूग्णवाहिकेतून मद्यसाठा जप्त करण्यात आली. या रूग्णवाहिकेतून विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 2 लाख रूपये आहे.या रूग्णवाहिकेवर नाशिकचे पालकमंत्री यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे फोटो लागलेले आहे.

10 ठिकाणी करण्यात येत होती तपासणी

नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका चार दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. या पार्श्‍वभुमीवर राज्य उत्पादन विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकमध्ये 10 ठिकाणी तपासणी करण्यात येत होती.अशातच आज सकाळी .नाशिकमध्ये संशयास्पदरित्या सायरन वाजवत जाणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्स जात होती. मुंबई आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात एका रुग्णवाहिकेतून मद्यसाठा जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे .यातून 26 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आले आहेत.या अ‍ॅम्ब्युलन्सवर सर्वच राजकीय नेत्यांचे फोटो होते.नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, जयकुमार रावल यांच्यासोबत शिवेसना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांचे फोटो अ‍ॅम्ब्युलन्सवर आहेत. याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. शिवेसना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.