रूग्णालयातील कमतरता लवकरच दुर होणार

0

पाळधी। जळगाव जिल्हा ग्रामीण रूग्णालयात येत्या तीन महिन्यात सीटीस्कॅन मशिन तीन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. तसेच जिल्हा रूग्णालयात वैद्यकिय अधिकार्‍यांची कमतरता असून लवकरच त्या रिक्त जागा भरली जाणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुुटूंबकल्याण मंत्री ना.डॉ. दिपक सावंत यांनी केले. पाळधी येथे तीन एकर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी मिळाल्यानंतर त्यासाठी नवीन वास्तूच्या भूमीपूजन शनिवार 19 ऑगस्ट रोजी मंत्री ना. दिपक सावंत यांच्याहस्ते यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. उद्घटनानंतर ते म्हणाले की, या नविन वास्तूचे बांधकाम येत्या 18 महिन्यात पुर्ण होणार आहे. सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. याचा लाभ पाळधी परीसरातील 30 ते 35 गांवाना होणार असल्याचे डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले.

जिल्ह्यात मेडीकल हब साठी 100 एकर जागा निश्‍चित
गेल्या दोन वर्षा आगोदर जिल्ह्यात महाअरोग्य शिबीर राबविण्यात आले होते त्यात अनेक गरजूंची रूग्ण तपासणी करण्यात आली. आज जामनेर मतदार संघ मोती बिंदू मुक्त आहे. या पार्श्‍वभुमीवर जळगाव जिल्हा मोती बिंदू मुक्त करत इतर आजारांसाठी जिल्ह्यात मेडीकल हब उभारण्यात येणार आहे, यासाठी 100 एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच पद्मालय परीसरातील धरण पुर्ण करण्यासाठी तरतूद करून सिंचनात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे परीसरातील सावदा, रिंगणगाव, रवंजा, म्हसावद, नागदुली ते पाळधीपर्यंत परीसरात याचा लाभ होणार असल्याचे जलसंपदामंत्री ना. महाजन यांनी सांगितले.

पाळधी महामार्गावर 108 क्रमांकाची गाडी हवी
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. पाळधी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी 1997 पासून पाठपुरावा केल्यानंतर या अखेर मंजूरी मिळाल्यानंतर तीन एकर जागेत सुजज्ज इमारत रूग्णालय सुरू होणार असून पाळधी प्राथमिक अरोग्य केंद्रात 2 वैद्यकिय अधिकारीसह 20 कर्मचारी 24 तास सेवा देणार आहे. रूग्णालयासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आरोग्य केंद्राची मोठी इमारत आणि लागणार्‍या इतर सुविधा मिळणार आहे. तसेच मोहाडी शिवारात 100 खाटांचे स्त्रियांसाठी रूग्णालय उभारण्याचा मानस असल्याचे सांगत पाळधी महामार्गावर अनेक अपघात होत असून जखमींवर तात्काळ उपचार व्हावे यासाठी 108 क्रमांकाची गाडी व म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर जिल्हा उपरूग्णालय आणि शिरसोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अश्या तीन मागण्या सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आरोग्य मंत्री ना. डॉ. दिपक सावंत यांच्याकडे केली.

महिला रूग्णालयाचे लवकरच भूमीपूजन होणार
पुढे बोलतांना आरोग्य मंत्री ना. सावंत म्हणाले की, आरोग्य खात्याचे आज अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे, त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रूग्णालयात वैद्यकिय अधिकार्‍यांची रिक्त जागांवर लवकरच भरती करून नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात योजनेला सुरूवात करत असून गरजू रूग्णास 30 हजार रूपयांपर्यंत सर्व घटकांपर्यंत लाभ मिळणार आहे. लवकर म्हसावद रूग्णालयासाठी साकारात्मक निर्णय घेण्याच्या विचारात आहे. जिल्ह्यात महिला रूग्णालयाचे भूमीपूजन येत्या तीन महिन्यात करण्यात येणार असल्याचे जाहिर आरोग्यमंत्री ना. सावंत यांनी केले.

जळगाव जिल्हा दुष्काळ जाहिर करावा- आ. पाटील
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आमदार किशोर पाटील यांनी प्रास्तविकातून जिल्ह्यातील रूग्णालयाची सर्व परीस्थिीची जाणीव करून देतांना सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्र ही काळाची गरज असून त्याचा उपयोग परीसरातील गोरगरीब जनतेच्या फायदा घेईल. मात्र आजच्या परीस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक समस्या आहेत. कुठे डॉक्टर नाही तर कुठे चांगल्या उपचारासाठी अ‍ॅम्ब्यूलन्स उपलब्ध नाही. यावर्षी पाऊस न झाल्याने जळगाव जिल्हा दुष्काळ जाहिर व्हावा अशी मागणी करत, शासनाने कर्जमाफीबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. तर शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाब पाटील यांनी जिल्हा रूग्णालयात सोनोग्राफीची यंत्रणेत वाढ करावी अशी मागणी आरोग्यमंत्री यांच्याकडे दिले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
भूमिपूजन सोहळा वेळी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, जि.प.सदस्य पवन सोनवणे, जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुलभूषण पाटील, चिंतामण जैतकर, हेमराज चव्हाण, धरणगाव पं.स. सभापती मंजुषा सचिन पवार, उपसभापती प्रेमराज पाटील, पं.स. सदस्य मुकुंदराव नंन्नवरे, पाळधी बुदुकचे सरपंच अलिम देशमुख, पाळधी खुर्द सरपंच वैशाली माळी, शरदशेठ कासट, अनिल कासट, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील, मोतीलाल पाटील, धरणगाव नगराध्यक्ष सलीम पटेल, पाळधी युवासेना शहरप्रमुख आबा माळी, गोकुळ नाना पाटील, बबलू पाटील, विश्वनाथ पाटील, गोविंद पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, सुलतान शेठ, साहेबराव पाटील, प्रकाश कुंभार, अनिल पंडित, गोपाळ सोनवणे, भूषण माळी, हेमंत पाटिल, सुनील पाटील, समाधान माळी, विभाग प्रमुख युवासेना पिंटू कोळी, चेतन पाटील, पवन पाटिल, हर्षल पाटील, दीपक श्रीखंडे, अनिल माळी, महेश झंवर, दीपक झंवर, विलास झंवर आदी उपस्थित होते.