जळगाव। येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात नवजात बालकांसाठी सुपरस्पेशॅलिट औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ठीकाणी शहरातील गरजू बालरूग्णांसाठी मोफत सेवा सुविधा देण्याची तयारी दाखवण्यात आलेली आहे. त्यासाठी महानगरपालिका देखील रूग्णांना सेवा देण्याबाबत पत्र देण्याच्या तयारीत आहे. डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे नवजात बालकांसाठी तज्ञ डॉक्टरामार्फेत सुपरस्पेशॅलीटी औषधोपचार उपलब्ध आहेत. या सर्व सेवा सुविधा गरीब व गरजू रूग्णांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावयाची तयारी दर्शवली आहे
पालिकेने निर्णय घेतल्यास गरीबांना मिळणार मदत
त्यासाठी महापालिकेने रूग्णांना रूग्णालयाचा संदर्भ द्यावा अशी विनंती रूग्णालयाच्या वतीने करण्यात आली असून तसे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे. महापालीकेच्या रूग्णालयात नवजात बालकावर उपचाराची पुरेशी सुविधा नसून खाजगी रूग्णालयातील उपचार न परवडणार्या रूग्णांना थेट सामान्य रूग्णालयात धाव घ्यावी लागते. परंतू आता पालिकेने संदर्भ दिल्यास डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे उपचार करता येणार आहे. यासाठी महापालिका रूग्णालयाला मोफत सेवेबद्दल पत्र देणार असून तसा ठराव करण्यासाठी महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या शाहू रूग्णालयात शासकिय दरात लसीकरण करून मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. परंतू लहान मुलांना उपचार करण्याची वेळ आल्यास गरीब व गरजूंना थेट खाजगी रूग्णालयात धाव घ्यावी लागते. उपचारावर होणारा खर्च हा परवडणारा नसल्याने गैरसोय होत असते. परंतू डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत सेवा मिळण्यासंदर्भात पालिकेने निर्णय घेतल्यास हातभार लागणार आहे.