संचारबंदी पालन करा, अन्यथा गुन्हे दाखल होतील : विजयसिंग राजपूत
नवापूर (प्रतिनिधी) – शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मास्क न घालून गेल्यामुळे आणि डॉक्टरांशी हुज्जत घातल्या प्रकरणी तरुणा विरोधात नवापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
शानिवारी रात्रि 9 वाजेच्या सुमारास नवापूर शहरातील विशाल सुनील पिसे (वय 26) मित्रासोबत उपजिल्हा रूग्णालयात आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होता. यावेळीडाॅ. युवराज पराडके व परिचारिका मोहने यांनी मास्क घाला, रूग्णालयात सोशल डिस्टन ठेवाआणि आपल्यापासुन इतर रूग्णाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, अशा सुचना त्या दोघांना केल्या. परंतू डाॅक्टर व परिचारिका यांनी केलेल्या सुचनेचे पालन न करता डाॅक्टर सोबत हुज्जत घातल्याप्रकणीडाॅ युवराज पराडके यांच्या तक्रारीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात विशाल सुनिल पिसे विरोधात राष्ट्रीय आपती व्यवस्थापन कायदा 2005, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना अंतर्गत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, युवकाला रात्री पोलीस ठाण्यात बोलावून नोटीस देऊन सुटका करण्यात आली आहे.
नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी सांगितले की देशात 21 दिवसांची संचारबंदी लागू असल्याने संचारबंदी पालन करावे घराबाहेर कोणीही निघू नये.बाहेर गेल्यास मास्कचा वापर करावा. भाजीपाला मार्केट, बाजारात जीवनावश्यक वस्तू घेण्यास गेल्यास रिंगमध्ये उभे राहून सोशल डिस्टन्सचे पालन करावे.अनावश्यक घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी करून नका अन्यथा गुन्हा दाखल केले जातील अशी माहिती दिली.