जळगाव। ठेवीदारांच्या सत्तर ते एैन्शी एजारांच्या ठेवी घेऊन पंकज रणवीर राठोड हा भामटा फरार झाला होता. परंतू, पोलिसांना त्याचा गेल्या काही दिवसांपासून पत्ताच लागन नव्हता. अखेर भामट्याच्या वडीलांचे उत्तर प्रदेशातील सारंगपुर येथे हॉस्पीटल व घर एकाच ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिस त्या ठिकाणी रूग्ण बनवून जावून तेथून पंकज या भामट्याला ताब्यात घेतले आहे. फरार झालेल्या भामट्यास पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सारंगपुर येथून रूग्ण बनवून त्याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील विसनजीनगरात पंकज रणवीर राठोड याच्या याने निर्तीती रिअल सर्व्हीसेस प्रा. लि. कंपनी सुरू केली होती. त्या ठिकाणी गायत्री विश्वनाथ सोनवणे ह्या फिल्ड डेव्हलेपमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. परंतू, पंकज याने सुमारे 2 हजार रुपयांच्या लोकांच्या सत्तर ते एैंन्शी लाखा रुपयांच्या ठेवी घेऊन पसार झाला. यानंतर गायत्री सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात 27 ऑक्टोंबर 2016 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सारंगपुरातून भामट्यास अटक
पंकज या भामट्यास गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा पेठ पोलिस शोध घेत होते. दोन ते तीन वेळेस माहिती मिळाल्यानंतरही पंकज हा पोलिसांच्या हाती आला नाही. यानंतर पोलिस उपनिरीक्षक गिरधर निकम यांना भामटा हा उत्तर प्रदेशातील सारंगपुर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गिरधर निकम यांनी पोलिस कर्मचारी सुधीर चौधरी, संजय पवार, रवी नरवाडे या कर्मचार्यांसह सारंगपुर गाठले. त्यानंतर संशयित भामट्याची संपूर्ण माहिती काढली. भामटा पंकज याचे वडील रणवीर राठो यांचे हॉस्पीटल व घर एकाच ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंकज त्याच ठिकाणी असल्याची माहिती कळताच जिल्हा पेठ पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. यानंतर पोलिस कर्मचारी सुधीर चौधरी यांनी रूग्ण बनून हॉस्पीटलात प्रवेश करत पंकज समोरच दिसताच त्याला ताब्यात घेतले. यानंतर पोलिस उपनिरीक्षक गिरधर निकम यांच्या पथकाने लागलीच भामट्याला घेवून जळगाव गाठले.