मुंबई । जगातील पहिला रिअल-टाइम क्रीडा सोशल इगेंजमेंट मंच रुटरने, न्यूझीलंडच्या आघाडीच्या क्रीडा पोशाख ब्रॅन्ड कॅटरबरीसह करार करत नुकत्याच भारत दौर्यावर येऊन गेलेल्या न्यूझीलंड संघातील खेळाडूंना भेटण्याची संधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मिळवून दिली. रुटर आणि कॅटरबरी यांनी न्यूझीलंड संघाच्या सराव सत्रात सहभागी होण्यासाठी काही निवडक चाहत्यांची निवड करण्यात आली होती. आयकॉनिक स्पोर्ट्स ब्रँड कॅटरबरीने नुकताच भारतात व्यवसाय सुरु केला आहे. भारतीय स्पोर्ट्स प्रेमींसोबत संबंध जोडण्यासाठी रूटर हे एक आदर्श व्यासपीठ त्यांना उपलब्ध झाले असून, रूटरने ब्रँडला फॅन बेसपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य संधी दिली आहे.