सोयगाव। पहिल्याच श्रावण सोमवार 24 जुलै रोजी सोयगावला भाविकांची मोर्ठी गर्दी दिसून आल्याने वेताळवाडीच्या जंगलात डोंगराच्या दरीत लपून बसलेले रुद्रेश्वरच्या लेण्यात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. यामुळे वेताळवाडीचे जंगल भाविकमय झाल्याचे दिसत होते. सोयगाव भागातील शासनाच्या पर्यटनस्थळाच्या दर्जावर नसलेले रुद्रेश्वाराचे लेणे आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, या रुद्रेश्वर लेण्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पायवाट शोधत भाविकांना जावे लागते. उत्खननाच्या 25 वर्षापासून जाण्यासाठी रस्ताच नाही.
रस्त्यांअभावी पायवाटचा आधार
वनविभागाने केवळ डोंगराच्या पायथ्याशी फलक लावून हातवर केले आहे. त्यामुळे पर्यटकांना शेतातील मजुरांना रस्ता विचारात जावे लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून या लेण्याची रस्त्याची मोठी समस्या भेडसावत आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी भेट देणार्यांची संख्या मोठी असते. श्रावण महिन्यात सोयगाव परिसरातील भैरवनाथ मंदिर, वेतालवाडी किल्ला, घटत्कोच लेणी, रुद्रेश्वर लेणी आदि ठिकाणी भाविक पर्यटनासाठी इतर ठिकाणाहून येतात जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव आदि खानदेशातील भागात ही ठिकाणे प्रसिद्ध आहे.
धबधब्यात सेल्फिचा मोह
दरम्यान सध्या सोयगाव परिसरात सुरु असलेल्या रिमझिम पावसात रुद्रेश्वर लेणीतील धबधबा वाहता झाला असल्याने श्रावण सोमवारी ता.24 पर्यटकांची धबधब्यावर सेल्फी काढण्याचा मोठा प्रयत्न केल्याने जीव मुठीत घ्यावा
लागला.