रूपाली वाघ यांना महाराष्ट्र साम्राज्ञी पुरस्कार

0

‘नृत्य स्पर्धा व ब्युटी प्लस टलेंट शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव । महिला व बालकाच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्‍वास वाढावा. याकरिता स्फूर्ती बहुउद्देशिय संस्था व आर.सी.बाफना ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र सम्राज्ञी 2018 ब्यूटी प्लस टॅलेन्ट शो‘मध्ये जळगावच्या कल्पना वर्मा यांनी तर प्रथम सम्राज्ञीचा मान सर्वश्री चिंतामणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रूपाली वाघ यांनी मिळाला असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र सम्राज्ञी पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अ‍ॅड. स्वाती निकम, ज्योती क्षीवास्त्व यांनी केले. विजेत्यांना आमदार सुरेश भोळे, पोलिस उपनिरीक्षक सुप्रीया देशमुख, सरस्वती फोर्डचे संचालक धवन टेकवाणी, जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी गरजू व्यावसायिक महिलांकरिता मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते.

यांना मिळाला पुरस्कार 
‘महाराष्ट्र सम्राज्ञी 2018 ब्यूटी प्लस टॅलेन्ट शो‘मध्ये जळगावच्या कल्पना गणेश वर्मा यांना तर प्रथम समाज्ञी रूपाली शाम वाघ, दिव्तीय रूपाली उमेश भावसार, तृतीय दिप्ती गणेश बारी, किरण दिलीप जाजू लातूर, चतूर्थ अर्चना अशोक येवले, पाचवी पूर्वा अतुल साळवी मुंबई, सहावी डॉ. सुषमा चौधरी ठरली. सामान्यज्ञानकरिता वासुदेव पाटील संचालक दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र यांनी परिश्रम घेतले. समूह नृत्य स्पर्धेत वृशाली देशपांडे बाल समूह, डीम डान्स अकेडमी, फंकी स्टार्स यांनी तर एकल नृत्य स्पर्धेत आरव जैन, मोहिनी महाले, दिवेश कोळी, पुजा खैरनार, सोहम कोष्टी व शिवाणी वाणी विजेते ठरलेत.

कार्यक्रम यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
यावेळी आमदार आमदार सुरेश भोळे यांनी बचतगटांकरिता ठोस कार्य करण्याचे आश्‍वासन दिले. ’कोमल है, कमजोर नही, शक्ती का नाम नारी है‘ या अर्चना येवले यांच्या नृत्याने तसेच सर्व स्पर्धकांच्या अदाकारीने, बालकांच्या नृत्य अविष्काराने उपस्थित सर्व जनसमूह भारावून भारावून गेला होता. कार्यक्रम यशस्वितेसाठी सचिव पांडे, शीतल महाजन, माऊली क्लासेसचे संचालक रवि पाटील, प्राची पाठक यांचे सहकार्य लाभले. कल्पना वर्मा, रूपाली वाघ, अर्चना येवले या स्पर्धक कार्यक्रमातील आकर्षण ठरल्यात. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पल्लवी भोगे-पाटील यांनी केले.